मराठमोळ्या मिथिला पालकरचा ख्रिसमस लूक पाहिलात का? शेअर केले क्युट Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:57 IST2024-12-25T12:42:19+5:302024-12-25T12:57:20+5:30
मिथिला पालकरच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स केले आहेत

वेब विश्वातील 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी मिथिला पालकर (Mithila Palkar) तिच्या क्युट बबली अंदाजाने नेहमीच प्रेमात पाडते. कुरळे केस (Curly hair girl) ही तर तिची खरी ओळक आहे.
'लिटिल थिंग्स','गर्ल इन द सिटी' या सीरिजमुळे तिल खरी लोकप्रियता मिळाली. 'मुरांबा' या मराठी सिनेमातही तिने काम केलं. शिवाय साऊथमधील काही सिनेमांमध्येही ती झळकली.
मिथिला सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. नुकतंच तिने ख्रिसमस निमित्त काढलेले फोटो शेअर केले. यामध्येही ती एकदम क्युट दिसत आहे.
लाल रंगाचा ब्रालेट टॉप, व्हाईट पँट, डोक्यावर ख्रिसमस बँड लावलेलं आहे. घरात तिन छान ख्रिसमस ट्री सजवला आहे. समोर स्ट्रॉबेरीज आणि इतर फळं ठेवली आहेत.
मिथिलाने या लूकमध्ये शेअर केलेले फोटो अगदीच गोड आहेत. त्यातच तिची क्युट स्माईल प्रेमातच पाडणारी आहे.
मिथिला आणि भाडिपाच्या गँगने काल रात्री एकत्र ख्रिसमस साजरा केलेला दिसतोय. तिने भाडिपाचा संस्थापक सारंग साठ्येसोबतही फोटो शेअर केला आहे.
तसंच तिचा जवळचा मिच्र, जिम ट्रेनर नुपूर शिखरेसोबतही तिने फोटो शेअर केला आहे. नुपूर शिखरे हा आमिर खानचा जावई आहे.