'कितनी मोहोब्बत है' मधली 'आरोही' आठवतेय का? नागराज मंजुळेंच्या वेबसीरिजमध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:52 PM2024-07-11T13:52:33+5:302024-07-11T14:06:01+5:30

कृतिका कामरा आणि करण कुंद्राचं अफेअर चांगलंच चर्चेत होतं. आता ही अभिनेत्री काय करतेय?

'कितनी मोहोब्बत है' ही टेलिव्हिजनवरील तरुणाईची लाडकी मालिका होती. करण कुंद्रा (Karan Kundra) आणि कृतिका कामरा (Kritika Kamra) ही फ्रेश जोडी मालिकेत झळकली होती. 2009 साली ही मालिका प्रसारित झाली होती.

या मालिकेत अभिनेत्री कृतिका कामराने 'आरोही' ही भूमिका साकारली होती तर करण कुंद्रा 'अर्जुन'च्या भूमिकेत होता. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांना डेट करत होते.

मालिकेतली सर्वांची लाडकी आरोही म्हणजेच अभिनेत्री कृतिका कामरा सध्या काय करते? कृतिका सुद्धा टेलिव्हिजन सोडून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

कृतिकाचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. दिल्लीत शिक्षण घेत असतानाच तिने फॅशन इंडस्ट्रीत काम सुरु केलं. तेव्हाच तिला 'यहाँ के हम सिकंदर' शो ऑफर झाला.

यानंतर 'कितनी है मोहोब्बते'शिवाय 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेनेही तिला लोकप्रिय केलं. यातील चुलबुली डॉक्टर सर्वांनाच आवडली.

टीव्हीवर यशाच्या शिखरावर असतानाच कृतिका मोठ्या पडद्याकडे वळली. तिने 'मित्रो','बेस्ट गर्लफ्रेंड','व्हाईट शर्ट','ड्राय ड्रीम्स' या सिनेमांमध्येही काम केलं.

कृतिकाला खरं यश मिळालं ते 'तांडव', 'मुंबई मेरी जान' या वेबसीरिजमुळे. तांडवध्ये तिला सैफ अली खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. शिवाय 'हश हश' या मल्टीस्टारर सीरिजमध्येही तिने भूमिका साकारली.

कृतिका लवकरच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' सीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. शिवाय सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधवही आहे. यांच्यासोबत