Web Series : 'पंचायत ते कॉलेज रोमान्स'; २०२२ च्या टॉप १० IMDb rated वेब सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:10 PM2022-12-14T17:10:34+5:302022-12-14T17:26:20+5:30

ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर वेबसिरिज येत असतात. अनेक सिरीजना प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते. घरबसल्या चांगला कंटेंट मिळतोय म्हणल्यावर कोणल पाहणार नाही. IMDb ने २०२२ च्या टॉप १० वेबसिरीजची यादी जाहीर केली आहे.

'पंचायत' सिरीजचा दिसरा पार्ट यावर्षी रिलीज झाला. हा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला. गावातल्या ग्रामपंचायत आणि जनतेची कहाणी यामध्ये अगदी विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

'दिल्ली क्राईम' ही क्राईम वर आधारित अप्रतिम वेब सिरीज. याचाही दुसरा सिझन यावर्षी रिलीज झाला होता. शेफाली शआह, रसिका दुग्गल, तिलोत्तमा यांच्या अभिनयाने सिरीज चांगलीच पसंत केली गेली.

'रॉकेट बॉइज' या सोनी लिव्हवर आलेल्या सिरीजचाही या यादीत समावेश आहे. सिरीजला IMDb ने ८.९ रेटिंग दिली आहे

'ह्युमन' ही थ्रिलर वेबसिरीज हॉटस्टारवर आहे. यामध्येही शेफाली शाह यांची मुख्य भुमिका आहे.

व्हुट वर प्रदर्शित झालेली 'अपहरण' ही वेब सिरीजही प्रचंड गाजली. यावर्षी सिरीजचा दुसरा पार्ट रिलीज झाला. ही एक थ्रिलर सिरीज असून प्रेक्षकांनी खूप पसंत केली.

'गुल्लक' ही आणखी एक अप्रतिम सिरीज. गुल्लकचा तिसरा सिझन यावर्षी रिलीज झाला. मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट यात मांडण्यात आली आहे. ही सर्वात जास्त रेट केलेली सिरीज आहे.

'NCR days' ही सुद्धा IMDb highest rated सिरीज आहे. कॉलेज जीवनावर आधारित ही सिरीज आहे.

'अभय' या लोकप्रिय सिरीजचा हा तिसरा सिझन यावर्षी रिलीज झाला. ही क्राईम थ्रिलर सिरीज झी ५ वर उपलब्ध आहे.

'कॅंम्पस डायरी' ही एमएक्स प्लेयर वरील सिरीज फक्त कॉलेज जीवन नाही तर इतर अनेक गंभीर विषयांवर बोलणारी आहे.

'कॉलेज रोमान्स' ही सोनी लिव्ह वरील सिरीज प्रेम, कॉलेजनंतरचे आयुष्य यावर आधारित आहे.