कलाविश्वापासून दूर आहे दिलीप प्रभावळकरांचा लेक; सूनबाई अन् मुलगा 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:51 PM2022-04-12T12:51:01+5:302022-04-12T12:54:51+5:30

Dilip prabhavalkars family:दिलीप प्रभावळकर यांना एक मुलगा व सूनदेखील आहेत. मात्र, ते दोघंदेखील कलाविश्वापासून दूर आहेत.

आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना बांधून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर.

वयाची ७० ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील अभिनयाचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही.

मालिका, सिनेमा, नाटकं या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.

प्रोफेशनल लाइफमुळे कायम चर्चेत येणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी जाणून घेऊयात.

अभिनयात येण्यापूर्वी ते टीसीएफ औषध निर्माती कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. नोकरी करता करता त्याच काळात ते बालरंगभूमीशी जोडले गेले.

दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर आहे. नीला चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून लांबच राहणे पसंत करतात.

दिलीप प्रभावळकर यांना एक मुलगा व सूनदेखील आहेत. मात्र, ते दोघंदेखील कलाविश्वापासून दूर आहेत.

केदार प्रभावळकर असं त्यांच्या मुलाचं नाव असून तो इन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडित आहे. त्याच्या प्रमाणेच त्याची पत्नी सोनल अलवारदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहे.