भारती व हर्षने असा साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस, शेअर केले रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 11:16 IST2020-12-04T11:04:29+5:302020-12-04T11:16:30+5:30
कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहेत.

कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहेत. घरात गांजा सापडल्यानंतर एनसीबीने दोघांनाही अटक केली. अर्थात यानंतर दोघेही जामिनावर सुटले. अशात काल गुरूवारी भारती व हर्ष यांनी लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी भारतीने हर्षला खास अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. भारतीने तिच्या लग्नाचे आणि प्री-वेडिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
‘तुम्ही किती दिवस, किती महिने, किती वर्षे एकमेकांसोबत आहात, हे मोजणे म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे,दरदिवशी तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी माय लव्ह....,’असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.
हर्षनेही लग्नाचा वाढदिवस खास फोटो शेअर करत साजरा केला. ‘संसार हा निभवायचा असतो, हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह,’ असा सुंदर मॅसेज लिहित त्याने पत्नी भारतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला असली तरी लोकांच्या मनात त्यांच्या विषयी राग बघायला मिळत आहे.
जामिन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षला ट्रोलचा सामना करावा लागला होता. यादरम्यान हर्षने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते.
कुणी भारती आणि हर्षला बॉयकॉट करण्याचे म्हटले होते तर कुणी थेट द कपिल शर्मा शो बॉयकॉट करा, अशा कमेंट केल्या होत्या. अशात एका युजरने जेव्हा भारतीला बॉयकॉट करण्याची कमेंट केली तर हर्षने त्याला ‘आता झोपा काका’, असे उत्तर दिले होते.
एनसीबीने दोघांच्या घरी धाड टाकली असता तिथे त्यांना 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता. ज्यानंतर दोघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
काही दिवसातच त्यांना जामीन मिळाला होता. ज्यात एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी मदत केल्याचेही समोर आले होते. नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आले.