Mom To Be! ४१व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म देणार दिव्यांका त्रिपाठी, बेबी शॉवरचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:03 IST2026-03-23T17:57:55+5:302026-03-23T18:03:10+5:30
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया लग्नानंतर १० वर्षांनी आईबाबा होणार आहेत. नुकतंच दिव्यांकाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला.

दिव्यांका त्रिपाठी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ये है मोहोब्बते मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

दिव्यांका लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया लग्नानंतर १० वर्षांनी आईबाबा होणार आहेत. नुकतंच दिव्यांकाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला.

तिच्या डोहाळजेवणाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दिव्यांकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे.

बेबी शॉवरसाठी दिव्यांकाने खास लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. पारंपरिक पद्धतीने तिचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

दिव्यांका आणि विवेक यांनी २०१६ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. दिव्यांकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

'बनू मे तेरी दुल्हन', 'क्राइम पेट्रोल', 'अदृश्यम', 'मिस्टर अँड मिसेस शर्मा', 'तेरे शहर में', कसम से या मालिकांमध्ये ती दिसली होती.

तर विवेकने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ये है मोहोब्बते' मालिकेत त्या दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.

आता लग्नाच्या १० वर्षांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन होणार आहे.

















