Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:33 IST2025-09-28T16:59:51+5:302025-09-28T17:33:20+5:30
Triptii Dimri : तृप्ती डिमरी फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
तृप्ती अनेक वेळा सॅम मर्चंटसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली आहे. मात्र तिने कधीही सॅमसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलेले नाही.
फिल्मफेअरशी झालेल्या संभाषणादरम्यान तृप्तीला सॅमसोबतच्या डेटिंगच्या रुमर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं.
"रिलेशनशिपमध्ये असण्याची गरज नाही, कारण आपली एक अट असते की जर आयुष्यात कोणतंही रिलेशनशिप नसेल तर काहीतरी गडबड आहे."
"आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं अनेकदा वाटतं. पण तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही" असं तृप्तीने म्हटलं आहे.
अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केलं की तिच्या "बुलबुल" चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला समजावलं की सिंगल राहण्यात काहीच चूक नाही.
"'बुलबुल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला शिकवलं की, तुमच्या आयुष्यात रोमान्स करण्यासाठी कोणी नाही यात काहीच गैर नाही.
"कारण तुम्ही इतर अनेक गोष्टी करू शकता. त्यामुळे या एका गोष्टीबद्दल दुःखी का व्हावं?" असंही तृप्ती डिमरीने म्हटलं आहे.
तृप्तीने सॅम मर्चंटसोबतच्या तिच्या नात्याबद्दल थेट बोलली नाही. ती "धडक २" चित्रपटात दिसली होती. तिचे असंख्य चाहते आहेत.