ढल गया दिन, हो गयी शाम... तृप्ती डिमरीच्या रेट्रो लूकची चाहत्यांना पडली भुरळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:51 IST2024-09-19T16:41:37+5:302024-09-19T16:51:45+5:30

नॅशनल क्रश तृप्ती डिमरी ही कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

तृप्ती डिमरी ही सिनेमात विविधरंगी भूमिका साकारताना दिसून येते आहे. काही तरी हटके करण्याकडे तिचा अधिक कल असतो.

तृप्ती ही सोशल मीडियावर सक्रिय असून, अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबीही ती शेअर करीत असते.

नुकतंच तृप्तीने सोशल मीडियावर एक रेट्रो लूक शेअर केला. ज्यात ती अगदी सुंदर दिसतेय.

यात तृप्तीने पिस्ता कलरची फ्लॉवर प्रिंटेड साडी परिधान केली आहे.

यावर साडीवर अभिनेत्रीने जुन्या दशकातील अभिनेत्रींसारखी हेअरस्टाईलसुद्धा केली आहे.

तृप्तीने केलेली 80-90 च्या दशकातील फॅशन, त्यालाच साजेशी वेशभूषा, हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावर शब्दांतही मांडता येणार नाही.

एवढंच काय तर सुरेख हास्यनं तर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकलवा आहे.

या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत, तिला 'सुंदर', '90 च्या दशकातील अभिनेत्री' असेही म्हटले आहे.

तृप्ती डिमरी आणि राजकुमार रावचा हा मसालेदार चित्रपट असून प्रेक्षकांना 90 च्या दशकातल्या जादुई युगात घेऊन जाईल.