‘बिग बॉस 14’मध्ये होणार टिकटॉक स्टार सोनाली फोगाटची वाईल्ड कार्ड एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 16:45 IST2020-12-20T16:30:49+5:302020-12-20T16:45:49+5:30
अनेक वादांमुळे चर्चेत असते हे नाव

सतत चर्चेत राहणा-या हरियाणाच्या भाजपा नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट आता नव्या अवतारात दिसणार आहेत. चर्चा खरी मानाल तर सोनाली लवकरच ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत.
‘द खबरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली लवकरच बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.
टिक टॉक स्टार अशीही सोनाली यांची ओळख आहे. वेगवेगळ्या कारणांनी त्या सतत चर्चेत असतात.
सोनाली या सुमारे दशकभरापासून भाजपात सक्रिय आहे आणि सध्या पक्षाच्या महिला आघाडीच्या नॅशनल वर्किंग कमेटीच्या व्हाईट प्रेसिडेंट आहेत.
यापूर्वी दूरदर्शनवर अँकर म्हणून त्यांनी काम केले होते. ‘अम्मा’ या मालिकेत त्यांनी अभिनेता नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी आदमपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.
सोनाली फोगाट या टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
सोनाली फोगाट यांनी हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चप्पलेनं मारहाण केली होती. सोशल मीडियावर सोनाली यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोनाली यांनी चप्पलेसह त्यांना थप्पडही लगावली होती. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे.