चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 22:41 IST2024-10-01T22:13:03+5:302024-10-01T22:41:24+5:30
Dhanashree Verma photoshoot: सोशल मीडियावर धनश्रीच्या नव्या फोटोशूटची तुफान चर्चा

Dhanashree Verma Hot Photoshoot:
अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला स्टार स्पिनर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्माची सोशल मीडियावर भरपूर चर्चा असते.
धनश्री ही एक उत्तम डान्सर आहे. त्यामुळे तिचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकताच धनश्रीने आपला २८ वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी पती युझवेंद्र चहलने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचे खास फोटो शेअर करून त्याचसोबत सुंदर असे कॅप्शनही लिहिले होते.
सध्या मात्र धनश्री आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोज पोस्ट केले आहेत.
धनश्री वर्माने मुंबईच्या डीवाय पाटील कॉलेजमधून पदवी घेतली असून तिचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
धनश्री ही चांगली डान्सर आणि कोरिओग्राफर असल्यामुळे फिटनेसबाबत आग्रही असते. त्यासोबतच फॅशनबाबतही खूप आघाडीवर असते.
कोरोनादरम्यान चहलने धनश्रीकडे नृत्य शिकण्यासाठी संपर्क साधला होता. तेथूनच त्या दोघांनी प्रेमकहाणी सुरू झाली.
ताज्या फोटोशूटबाबत बोलायचे तर धनश्रीने आपल्या अकाऊंटवर सिल्व्हर कलरच्या रत्नजडित गाऊनचा फोटो पोस्ट केलाय.
एखाद्या शॅम्पेनच्या ग्लासप्रमाणे माझा ड्रेसही चमकदार आहे असे कॅप्शन धनश्रीने आपल्या फोटोंवर लिहिले आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य - धनश्री वर्मा इन्स्टाग्राम)