'येऊ कशी तशी..'फेम किंजलचा नवरा आहे लोकप्रिय दिग्दर्शक; 'या' गाजलेल्या मालिकेसाठी केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 07:00 IST2022-03-14T07:00:00+5:302022-03-14T07:00:00+5:30

Suvedha desai: सोशल मीडियावर सक्रीय असलेली सुवेधा अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काही दिवसांपूर्वीच किंजल या नव्या भूमिकेची एन्ट्री झाली होती.

या मालिकेत किंजल ही भूमिका अभिनेत्री सुवेधा देसाई हिने साकारली होती.

येऊ कशी तशी मी नांदायलामध्ये सुवेधाने चिन्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

या मालिकेत सुवेधाने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यांमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली.

सुवेधा खऱ्या आयुष्यात विवाहित असून तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

सुवेधा खऱ्या आयुष्यात विवाहित असून तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

सुवेधाच्या नवऱ्याचं नाव सागर गावकर आहे.

सागर हा प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहे.

सागरने सुवासिनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.