'तू एवढी सुंदर का आहेस?'; पूजा बिरारीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:10 PM2024-06-06T16:10:13+5:302024-06-06T16:14:08+5:30

Pooja birari: पूजाने अलिकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा साधेपणा पुन्हा एकदा नेटकऱ्यांना खुणावत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी.

उत्तम अभिनय आणि साधेपणा यांच्या जोरावर तिने लोकप्रियता मिळवली.

पूजा सध्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

पूजाने अलिकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा साधेपणा पुन्हा एकदा नेटकऱ्यांना खुणावत आहे.

'तू एवढी सुंदर का आहेस', 'सगळ्यांचं लक्ष फक्त तुझ्या सौंदर्यावरच आहे', 'खरंच तू खूप छान दिसते', अशा कितीतरी कमेंट पूजाच्या फोटोवर आल्या आहेत.

पूजाने मोजक्या मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु, प्रत्येक मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.