जितकी साधी तितकीच सुंदर! तेजश्री प्रधानचे फोटो पाहून प्रेमातच पडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:58 IST2024-12-26T16:55:56+5:302024-12-26T16:58:48+5:30

तेजश्रीने निळ्या रंगाच्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजश्रीचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

तेजश्रीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

नुकतंच तेजश्रीने निळ्या रंगाच्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजश्रीचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

अगदी साधा मेकअप आणि खड्यांची ज्वेलरी तिने घातली आहे. साध्या लूकमध्येही तेजश्रीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

"रजनीगंधा फूल तुम्हारे, महके यूँ ही जीवन में", असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'होणार सून मी ह्या घरची' नंतर तेजश्री 'अग्गबाई सासूबाई' मालिकेत दिसली होती. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मालिकांबरोबरच तेजश्रीने नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.