PHOTOS : ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल’ निया शर्माच्या आईला बघितलंय का? लेकीइतकीच आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:45 PM2022-03-01T16:45:28+5:302022-03-01T17:04:45+5:30

Nia Sharma : निया शर्मा टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री. बोल्डनेसमुळे सतत चर्चेत राहणारी. पण तिची आई सुद्धा तिच्याइतकीच सुंदर व ग्लॅमरस आहे.

निया शर्मा टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री. बोल्डनेसमुळे सतत चर्चेत राहणारी. पण तिची आई सुद्धा तिच्याइतकीच सुंदर व ग्लॅमरस आहे.

होय, नियाची आई लेकीइतकीच ग्लॅमरस आहे. नियाने आईसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

आईच्या वाढदिवसानिमित्त तिने फोटो शेअर केले आहेत. यात तिची आई उषा शर्मा दिसतेय. नियाची आई तिच्या इतकीच सुंदर आहे.

नियाची आई सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सतत स्वत:चे फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते.

उषा यांचे इन्स्टाग्रामवर 3277 फॉलोअर्स आहेत. उषा मात्र फक्त 27 लोकांना फॉलो करतात. यात त्यांची लाडकी लेक नियाचाही समावेश आहे.

निया शर्माने 'काली: एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून टीव्हीवरील करिअरची सुरुवात केली.

'एक हजारों में मेरी बेहना है' या मालिकेतून नियाला खूप प्रसिद्धी मिळाली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

2017 मध्ये सेक्सिएस्ट एशियन वूमनच्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.