नेहमीच मॉर्डन कपड्यात दिसणाऱ्या निया शर्माचा हा देसी अंदाज पाहून चाहते झाले अवाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:10 IST2021-02-19T18:10:49+5:302021-02-19T18:10:49+5:30

निया शर्माने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले असून ती या फोटोंत पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे.

नियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून ते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

निया भारतीय पेहरावात खूपच छान दिसते असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते.

लवकरच निया शर्मा आणि रवि दुबे यांच्या सीरिजचा दुसरा सीजन ‘जमाई राजा 2.0’ प्रदर्शित होणार आहे.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.

निया ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही झळकली होती.