१८ दिवसांचं प्रेम, पळून लग्न; आमिरच्या सावत्र भावाचं खरं रुप समोर येताच अभिनेत्रीला झाला पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:58 IST2025-07-20T13:48:29+5:302025-07-20T13:58:30+5:30
१८ दिवसांची ओळख अन् प्रेम झालं; पळून जाऊन केलं आमिरच्या भावाशी लग्न; पतीचं खरं रुप समोर येताच अभिनेत्रीला झाला पश्चाताप

पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबाबत जाणून घेण्यास प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते. अनेकदा हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य करतात.
त्यात हल्लीच्या जमान्यात एखाद्या कलाकाराचं लग्न, घटस्फोट होणं या गोष्टी अगदीच सामान्य झाल्या आहेत. परंतु, टेलिव्हिजन विश्वातील अशीच एक अभिनेत्री जी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. या अभिनेत्रीचं नाव ईवा ग्रोवर आहे.
अवघ्या १८ दिवसांच्या ओळखीत अभिनेत्रीने पळून जाऊन लग्न केलं आणि तिच्यावर पश्चातापाची वेळ आली.
सलमान खानसोबत 'रेडी' चित्रपटात झळकलेली ईवा ग्रोवर तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत राहिली. तसंच ईवाने राम कपूर आणि प्रिया यांच्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेतली खलनायिका साकारली होती.
आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर तिच्यावर लग्नाच्या ४ दिवसांत पश्चाताप होण्याची वेळ आली. तिने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले.
ईवा ग्रोवरने 'कॉफी अनफिल्टर्ड' पॉडकास्टमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. अभिनेत्री आमीर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानच्या प्रेमात होती. त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगीही झाली.
या मुलाखतीत अभिनेत्रीने असंही म्हटलं होतं की, तिचं लग्न पाच वर्षे टिकलं, पण तरीही त्यांच्या नात्यामध्ये बऱ्याच समस्या होत्या. तिने तिचे घर तुटू नये यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिचा नवरा जबाबदारी घ्यायला तयार नव्हता.
मात्र, नंतर तिने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.ईवाने सांगितले की तिच्या मुलीलाही तिच्यापासून हिरावून घेण्यात आले. . माझी मुलगी फक्त ३ वर्षांची होती. तिच्या कस्टडीसाठी मला खूप झगडावं लागलं. असंही तिने या मुलाखतीत सांगितलं.