पाहा... तुला पाहाते रे फेम शिल्पा तुळसकरच्या खऱ्या आयुष्यातील हँडसम नवऱ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:02 IST2019-06-19T20:24:14+5:302019-06-20T11:02:18+5:30

शिल्पाने तुळसकरने अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे.

शिल्पाने आजवर पलछीन, दिल मिल गये, संजीवनी, लेडीज स्पेशल यांसारख्या अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे

डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, शुगर सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या चित्रपटांतील शिल्पाच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या आहेत.

सध्या शिल्पा तुला पाहते रे या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली राजनंदिनी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

शिल्पाचे लग्न विशाल शेट्टीसोबत झाले असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

विशाल हा हॉटेल बिझनेस मध्ये असून शिल्पाच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये ती अनेकवेळी तिच्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करते.

शिल्पाचा पती हा हँडसम असून त्यांची जोडी शिल्पाच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

तुला पाहाते रे ही मालिका लवकरच संपणार असून प्रेक्षक शिल्पाला मिस करणार यात काहीच शंका नाही.

शिल्पा कामात कितीही व्यग्र असली तरी ती नेहमीच तिच्या कुटुंबियांसाठी वेळ काढते.

शिल्पा आणि विशाल यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री असून ती त्यांच्या फोटोंमधून देखील आपल्याला पाहायला मिळते.