What ! The kapil sharma show घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आलं या मागचं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:37 IST2022-06-07T15:07:37+5:302022-06-07T15:37:48+5:30
The kapil sharma :आता कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कॉमेडियन कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून करतो.(Photo Instagram)
छोट्या पडद्यावरचा हा प्रचंड लोकप्रिय शो आहे. शोमधले कलाकार कॉमेडी स्किट सादर करत रसिकांना हसून हसून लोटपोट करत असतात. (Photo Instagram)
शोमधला प्रत्येक कलाकार आज घराघरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांची प्रचंड लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते. (Photo Instagram)
पण आता कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ काही वेळासाठी ब्रेक घेणार आहे. हा शो आता ऑफएअर होणार आहे. (Photo Instagram)
हा शो सुपरहिट होण्यामागे कपिलसह त्याच्या संपूर्ण टीमचाही सिंहाचा वाटा आहे. पण पुन्हा एकदा या सगळ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी काही दिवस प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.(Photo Instagram)
या शोच्या यशमागे कपिलसह संपूर्ण टीमचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Photo Instagram)
‘द कपिल शर्मा शो’चे याआधी दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा या शोचा तिसरा सीझन होता. ५ जून रोजीच या शोच्या तिसऱ्या सीझनचा शेवटचा भाग प्रसारित झाला. (Photo Instagram)