'माधवी' इतकीच देखणी दिसते तारक मेहता मधील आत्माराम भिडेची पत्नी! स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:58 IST2025-12-24T17:46:41+5:302025-12-24T17:58:06+5:30

'तारक मेहता' फेम आत्माराम भिडेची खऱ्या आयुष्यातील पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री, सौंदर्यात माधवीला देते टक्कर

तारक मेहता ही छोट्या पडद्यावरील कौटुंबिक मालिका प्रेक्षक आजही मोठ्या आवडीने पाहतात.

या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान, या मालिकेत शिक्षकाची भूमिका मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडेकरने साकारली आहे. मालिकेत आत्माराम भिडे, पत्नी माधवी भिडे आणि त्यांची मुलगी सोनू असं त्रिकोणी कुटुंब दाखवण्यात आलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. गोकुळधाम सोसायटी आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांना आपलाच वाटतो.

मात्र, तुम्हाला माहितीये का? मंदारची खऱ्या आयुष्यातली पत्नीही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

‘१०:२९ की आखरी दस्तक’, ‘नवे लक्ष्य’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे.

सध्या स्नेहल स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करताना दिसते आहे.

या मालिकेत ती मंजू नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.