Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:12 IST2025-06-20T19:06:51+5:302025-06-20T19:12:21+5:30

Tejasswi Prakash And Karan Kundrra : अभिनेत्रीने ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. त्यांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणी असते.

तेजस्वीने तिच्या वाढदिवसाला महाकाल मंदिरातून फोटो शेअर केला. मात्र या फोटोत करण कुंद्रा नसल्याने त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगली आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा गोष्टींचा तिच्यावर परिणाम होत नसल्याचं स्पष्टच सांगितलं

"मला माहित आहे की, आमच्या पर्सनल आयुष्यावर लोकांचा जास्त फोकस आहे. पण ते फक्त ब्रेकअपवर फोकस करतात असं मला वाटत नाही."

"आमचे चाहते अशा गोष्टी करून स्वतःचच मनोरंजन करत आहेत. पण ते ठीक आहे, काही हरकत नाही. मला काही फरक पडत नाही."

"आम्हाला या गोष्टी मजेदार वाटतात. या गोष्टी ऐकल्यावर आम्हाला हसायला येतं. मला वाटतं की, लोक आम्हाला एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत."

"आम्हाला लोकांकडून खूप जास्त प्रेम मिळतं. करण सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मी माझे प्रोजेक्ट्स करत आहे" असं तेजस्वीने म्हटलं आहे.

करण-तेजस्वी हे टीव्हीवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी आहेत. बिग बॉस १५ मध्ये ही जोडी दिसली होती. ते २०२१ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.