SEE PICS : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील अय्यरला ख-या आयुष्यात मिळणार ‘बबीता’

By रूपाली मुधोळकर | Published: November 3, 2020 01:41 PM2020-11-03T13:41:31+5:302020-11-03T13:57:07+5:30

लवकरच चढणार बोहल्यावर

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अय्यरची भूमिका अशीच एक आवडती भूमिका.

मालिकेत ही भूमिका तनुज महाशब्दे साकारत आहे. या मालिकेत तनुज दाक्षिणात्य भूमिका साकारत आहे. त्याची हिंदी बोलण्याची ढब देखील एखाद्या दाक्षिणात्य माणसाप्रमाणेच आहे. त्यामुळे तो ख-या आयुष्यात देखील दाक्षिणात्य असेल असेच सगळ्यांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, ख-्या आयुष्यात तनुज हा महाराष्ट्रीयन आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबीताच्या पतीची भूमिका साकारणारा तनुज ख-या आयुष्यात अविवाहित आहे.

या मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसून तो लग्नासाठी मुली शोधत असल्याचे दाखवण्यात येते. पण पोपटलालची व्यक्तिरेखा साकारणाºया श्याम पाठकचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले देखील आहेत. पण तनुजचे अजून लग्न झालेले नाही. तनुज खº्या आयुष्यात त्याच्या आयुष्यातील बबिता शोधत आहे.

मात्र 46 वर्षाचा तनुज पुढील वर्षी लग्न करणार आहे. परमेश्वराची इच्छा असेल तर पुढील वर्षी माझे लग्न नक्की होईल, असे तनुजने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले.

बबीता अर्थात मुनमुन दत्तासोबत काम करण्याचा अनुभवही त्याने शेअर केला. आम्ही सेटवर खूप प्रोफेशनल वागतो. शूटींग संपली की, ती तिच्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने निघतो. अर्थात आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असे तनुजने सांगितले.

तनुज इंदूरमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी तो मुंबईत आला.

अय्यरची भूमिका साकारण्यासाठी तनुजने बरीच मेहनत घेतली होती. ही भूमिका साकारण्याआधी अनेकदिवस तो चेन्नईत राहिला आणि येथील लोकांच्या देहबोलीचा अभ्यास केला होता.

तनुजने यापूर्वी आणखी बरेच कार्यक्रम केले आहेत. त्याला थिएटरमध्येही रस आहे. याशिवाय तो स्क्रिप्ट राइटिंगही करत असतो.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने नुकतेच ३ हजार भाग पूर्ण केले आहेत.