'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा
By देवेंद्र जाधव | Updated: March 28, 2025 15:20 IST2025-03-28T14:15:42+5:302025-03-28T15:20:17+5:30
तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत गुलाबोच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सध्या काय करते? बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील गुलाबो प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. जेठालालची दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या गुलाबोचा ट्रॅक मालिकेत चांगलाच गाजला
गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली. सिंपलची 'तारक मेहता..'मधील भूमिकेने चांगलीच गाजली. सिंपल सध्या काय करते, याविषयी जाणून घ्या
सिंपल सध्या तरीही कोणत्याही मालिकेत किंवा इतर शोमध्ये काम करत नाहीये. सिंपलची मुंबईत ३ रेस्टॉरंट असल्याचं समजतंय.
सिंपलने थेट बॉलिवूड अभिनेता सलमान खानशीही पंगा घेतला होता. बिग बॉसच्या १२ व्या सीझनमध्ये सलमानने करणवीर बोहराला सुनावलं होतं.
करणवीर हा सिंपलचा मित्र असल्याने तिला सलमानचा राग आला होता. तिने ट्विटरवर सलमानवर राग व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती.
सिंपल कौल रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. २०१० ला सिंपलने राहुल लूंबासोबत लग्न केलं.
सिंपल कौल सध्या कोणत्याही टीव्ही प्रोजेक्ट आणि मालिकेत दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. सिंपलचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.