तारक मेहता...'मधील चंपक चाचांच्या पत्नीला पाहिलंय का? सौंदर्यात बबिताजींनाही देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:37 IST2025-06-25T15:28:13+5:302025-06-25T15:37:56+5:30
चाचाजींच्या भूमिकेमुळे अभिनेते अमित भट घराघरात पोहोचले. खऱ्या आयुष्यात ते जेठालालपेक्षाही लहान आहेत. तर त्यांची पत्नी 'या' क्षेत्रात काम करते.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजलेल्या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय आहेत. त्यातलेच एक चंपक चाचा.
पांढरे केस, टोपी, कुर्ता, पायजमा असा त्यांचा नेहमी लूक असतो. तसंच हातात काठी असते. मालिकेत त्यांनी वयस्कर अभिनेत्याची भूमिका केली असली तरी खऱ्या आयुष्यात ते तरुण आहेत.
अभिनेते अमित भट यांनी चंपक चाचाजींची भूमिका साकारली आहे. जेठालालचे ते बाबूजी आहेत तर टप्पूचे दादाजी. चंपक चाचाही त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
अभिनेते अमित भट फक्त ५१ वर्षांचे आहेत. म्हणजेच ते जेठालालपेक्षाही लहान आहेत. अभिनेते दिलीप जोशी ५७ वर्षांचे आहेत.
अमित भट यांच्या पत्नीचं नाव कृती भट आहे. १९९९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कृती या दिसायला अतिशय सुंदर आहेत. तारक मेहताच्या बबिताजींनाही मागे टाकतील असं त्यांचं सौंदर्य आहे.
अमित भट यांच्या पत्नीचं नाव कृती भट आहे. १९९९ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. कृती या दिसायला अतिशय सुंदर आहेत. तारक मेहताच्या बबिताजींनाही मागे टाकतील असं त्यांचं सौंदर्य आहे.
कृती या डाएटिशियन आणि न्युट्रिशनिस्ट आहेत. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्या वेटलॉस आणि न्युट्रिशनचे सल्ले देतात.
स्वत: न्युट्रिशनिस्ट असल्याने कृती या अतिशय फीट आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. देव आणि दीप अशी त्यांची नावं आहेत.