स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तिला ओळखणे देखील होईल अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:17 IST2019-06-17T19:07:49+5:302019-06-17T19:17:04+5:30

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.
या मालिकेमुळे सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळत आहे.
या मालिकेतील येसूबाई ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.
येसुबाई ही भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत असून तिला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
येसुबाई या भूमिकेसाठी प्राजक्ता नेहमीच नऊवारी साडी नेसते. तसेच भरगच्च दागिने घालते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात तिला ओळखणे देखील तिच्या चाहत्यांना कठीण जाते.
प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात पाश्चिमात्य कपडे देखील घालायला आवडतात.
या मालिकेसाठी प्राजक्ताने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.
प्राजक्ता शालेय, आंतरशालेय एकांकिका, नाटकांमध्ये भाग घ्यायची.
प्राजक्ताला बॉलिवूड, हिप-हॉप आणि कथ्थक हे सर्व डान्सचे प्रकार येतात.
या मालिकेमुळे प्राजक्ताला आता प्रेक्षक महाराणी येसुबाई म्हणूनच ओळखू लागले आहेत.