पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुशांत सिंग राजपूतची लोकप्रिय मालिका 'पवित्रा रिश्ता', जाणून घ्या कोणत्या चॅनलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:02 IST2020-06-30T14:02:46+5:302020-06-30T14:02:46+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

झी अनमोल चॅनलवर 'पवित्र रिश्ता' मालिके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या येणार आहे.

चॅनेल सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली म्हणून त्याचा सर्वात लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू करणार आहे.

मालिकेमध्ये मानव देशमुखच्या भूमिकेत सुशांत सिंग राजपूतला एक वेगळी ओळख मिळाली. तर अंकिताही या शोमधून घराघरात पोहोचली

'पवित्र रिश्ता'मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन व्यक्तिंची सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली होती.

'पवित्र रिश्ता' आता झी अनमोलवर दररोज सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4-6 दरम्यान प्रसारित केली जाणार आहे.

'पवित्र रिश्ता' मालिकेमधून सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी सुरुवात झाली होती.