सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल, ‘अप्सरा’ आली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 17:48 IST2020-12-24T17:41:31+5:302020-12-24T17:48:11+5:30
आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णीने तिच्या लुक्सने सा-यांना याड लावलं आहे.

विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.
'डान्सिग क्वीन' शोमध्ये आल्याने ती जास्त आनंदित आहे.
यावेळी तिने तिच्या विविध अदा कॅमे-यात कैद केल्या आहेत.
सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.
शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.
तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेले निवडक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही.
या फोटोत सोनालीचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे.
सिंपल अँड सोबर लूकमध्ये सोनालीने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे.
सोनालीचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे.
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.