गोड गळ्याची सुंदर 'राधिका'! मराठी पॉप गाण्याने अख्खं सोशल मीडिया डोक्यावर घेणारी 'ती' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:45 IST2025-10-25T13:36:29+5:302025-10-25T13:45:59+5:30
राधिकाच्या या गाण्याने सध्या सोशल मीडिया मंत्रमुग्ध झालं आहे. कोण आहे ही सुंदर गायिका?

'आय पॉपस्टार' या संगीत रिएलिटी शोमधील एक मराठी आवाज महाराष्ट्रभर गाजतोय. 'मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी...' या गाण्याने आणि गायिकेने रसिकांना प्रेमातच पाडलंय.

ही गायिका आहे राधिका भिडे. २४ वर्षांची राधिका एका प्रसिद्ध गायिकेची बहीण आहे. 'सा रे ग म प'फेम गायिका शमिका भिडेची ती लहान बहीण आहे.

'आय पॉपस्टार'शोमध्ये तिच्या गाण्याने, तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'मन धावतंया तुझ्याच मागं...' हे अस्सल मराठी मातीतलं ओरिजनल पॉप साँग गाऊन तिने परीक्षकांनाही मराठी भाषेच्या प्रेमात पाडलं.

हे गाणं स्टेजवर परफॉर्म करताना तिने सुंदर लूक केला होता. काळा ब्लाऊज, जांभळी नऊवारी, नथ, कपाळी चंद्रकोर, साजेसे सोन्याचे दागिने असा तिचा मराठमोळा लूक होता.

राधिकाच्या आवाजाने आणि तिच्या सौंदर्यामुळे तिने सर्वांना प्रेमात पाडलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच काय तर देशात तिची चर्चा आहे. तिच्या निरागस आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

राधिका मूळची रत्नागिरीची आहे. सध्या ती मुंबईत असते. राधिका अजय-अतुल, श्रेया घोषाल यांच्या कॉन्सर्ट्सचा भाग राहिली आहे.

एका गाण्यामुळे लोकप्रिय झालेल्या राधिका भिडेच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झाली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ७० हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.


















