शुभांगी अत्रेने 'भाबीजी घर पर है' मालिका सोडण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाली - "कुठेतरी पोहोचण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:38 IST2025-12-19T13:32:25+5:302025-12-19T13:38:27+5:30
Shubhangi Atre : शुभांगी अत्रे ही टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक, ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते.

शुभांगी अत्रे ही टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक, ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' या मालिकेत 'अंगुरी भाभी' साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, आता या मालिकेतून ती बाहेर पडली आहे.

शुभांगीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही मालिका सोडण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. काही अडचण होती की तिला एखादी नवीन मालिका मिळाली आहे, यावर तिने भाष्य केले.

मालिकेला निरोप देण्याबाबत बोलताना शुभांगी म्हणाली, "कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी बाहेर पडणे खूप गरजेचे असते."

ती पुढे म्हणाली की, "मी या मालिकेसाठी खूप योगदान दिले आहे. मला असे वाटते की, एका अभिनेत्यासाठी कोणत्याही मालिकेला आपली १० वर्षे देणे पुरेसे असते."

शुभांगीच्या मते 'भाभीजी घर पर है' ही मालिका तिच्या हृदयाच्या नेहमीच जवळ राहील, पण एक कलाकार म्हणून तिला आता काहीतरी नवीन करून पाहायचे आहे.

"अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला अनुभवायच्या आहेत, म्हणूनच मी ही मालिका सोडली," असे शुभांगीने सांगितले.

जेव्हा तिला विचारण्यात आले की, तुला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकण्याची भीती वाटते का? तेव्हा तिने उत्तर दिले, "सोशल मीडिया आणि सध्या उपलब्ध असलेल्या विविध प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला आमची खरी बाजू लोकांसमोर मांडण्याची संधी मिळते."

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, "सोशल मीडियामुळे लोक आज मला जितके 'अंगुरी भाभी' म्हणून ओळखतात, तितकेच 'शुभांगी अत्रे' म्हणूनही ओळखतात. २०२६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल, अशी मला आशा आहे."

















