कोणतीही जीम न लावता शहनाजने घरगुती उपायांनी वजन केलं कमी, आहारात केले 'हे' मोठे बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:29 IST2025-05-28T16:46:33+5:302025-05-28T17:29:35+5:30
shahnaaz gill weight loss journey: शहनाज गिलने जीम वगैरे न लावता घरगुती उपायांनी तिचं वजन कमी केलंय. अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन बघून तिचे चाहते थक्क झालेत

शहनाजने केवळ ६ महिन्यांमध्ये १२ किलो वजन कमी करुन सर्वांना थक्क केलं आहे. कोणतीही जीम न लावता घरबसल्या आहारावर नियंत्रण मिळवून वजन कमी केलं.
सकाळची सुरुवात: शहनाज आपल्या दिवसाची सुरुवात हळदीच्या पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर (apple cider vinegar) मिसळून करते. यानंतर ती एक कप चहा घेते. या दोन गोष्टीमुळे तिची इम्युनिटी वाढते.
नाश्ता: पुढे शहनाज प्रथिनयुक्त नाश्ता करते. या नाश्त्यामध्ये मूग, डोसा, मेथी पराठा, किंवा भाज्यांनी भरलेले पोहे किंवा दही यांचा समावेश असतो.
दुपारचे जेवण: शहनाज दुपारी डाळ, तूप लावलेली रोटी, स्प्राउट्स सॅलड आणि टोफू खाते. ज्यामुळे तिला जेवणातून आवश्यक ती पोषणतत्व मिळतात.
संध्याकाळचे स्नॅक्स: संध्याकाळी चहा वगैरे न घेता शहजान तूपात भाजलेले मखाने खाते. मखाना हे कमी कॅलरीचे असून पचनासाठी फायदेशीर असतात.
रात्रीचे जेवण: शहनाज रात्री हलके जेवण करते. ज्यात खिचडी, दही किंवा दूधीच्या भाजीचं सूप यांचा समावेश असतो.
आहारातील बदल: शहनाजने मांसाहारी पदार्थ, चॉकलेट आणि आइस्क्रीम यांसारख्या गोष्टी आहारातून पूर्णपणे काढून टाकल्या. शहनाज जेवताना अन्नाचं प्रमाण कमी करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
झोपेची वेळ: शहनाज दररोज किमान ७ तास झोप घेते. रात्री १० वाजता झोपून ती सकाळी ४ वाजता उठते, ज्यामुळे पुरेशी झोप मिळून तिला आवश्यक ती विश्रांतीही मिळते.