Photos: समृद्धी केळकरचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज, साधी भोळी दिसणारी गावाकडची सून खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:47 IST2026-03-15T12:42:56+5:302026-03-15T12:47:16+5:30

समृद्धीने नुकतंच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने समृद्धीला प्रसिद्धी मिळवून दिली.

सध्या समृद्धी स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत कृष्णा ही भूमिका साकारत आहे.

मालिकेत साधी भोळी दिसणारी गावाकडची संस्कारी सून खऱ्या आयुष्यात मात्र भलतीच ग्लॅमरस आहे.

समृद्धीने नुकतंच तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने गोल्डन हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.

केस मोकळे सोडल्याने समृद्धीचं सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचं दिसत आहे. फोटोंसाठी समृद्धीने खास पोझही दिल्या आहेत.

मालिकेत साध्या दिसणाऱ्या कृष्णाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.

समृद्धीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे.