PHOTO : शुभमन गिलसोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये रडताना दिसली अभिनेत्री रिद्धिमा पंडित, चाहते चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:57 PM2024-06-07T17:57:07+5:302024-06-07T18:07:12+5:30

'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडीत (ridhima pandit).

रिद्धिमा ही बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

नुकतंच रिद्धिमाचं क्रिकेटर शुभमन गिलसोबत नाव जोडलं गेलं. दोघांचा विवाह येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

मात्र, अभिनेत्रीने स्वत: स्पष्टीकरण देत या सर्व बातम्या अफवा असल्याचं सांगितलं.

आता सध्या रिद्धिमाची पुन्हा एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

क्रिकेटर शुभमन गिलसोबतच्या लग्नाच्या अफवांचे खंडन केल्यानंतर रिद्धिमाची ही पोस्ट समोर आली आहे.

शुभमन गिलसोबत नाव जोडलं गेल्यावर अभिनेत्री म्हणाली, "शुभमन गिल याला वैयक्तीक ओळखतही नाही. सोशल मीडियावरील चर्चेनंतर मला सकाळपासून अभिनंदनाचे संदेश मिळू लागले आणि मी या चर्चांना नकार देऊन कंटाळले. शेवटी, मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. मी लग्न करत नाही आहे. माझ्या आयुष्यात असं काही महत्त्वाचं घडलं तर मी स्वतः पुढे येऊन ही बातमी शेअर करेन. ".

गेल्या अनेक दिवसांपासून शुबमन गिल आणि रिद्धिमा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे, पण त्यांना आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवायचे आहे असे म्हटले जात आहे.

रिद्धिमा पंडित 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेमधून खूप प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे ती रातोरात स्टार झाली. यामध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती.

रिद्धिमा 'खतरा खतरा' सारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. एकता कपूरच्या बेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.