राकेश बापटची मराठी मालिकाविश्वात एन्ट्री; झी मराठीवर 'या' मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:17 AM2024-01-31T11:17:40+5:302024-01-31T11:22:26+5:30

Raqesh bapat: झी मराठीवर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकीच एका मालिकेत राकेश मुख्य भूमिका साकारणार आहे.

हिंदी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे राकेश बापट.

तुम बिन, कुबूल हैं, सात फेरे, मर्यादा, होगें जुदा ना हम यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.

राकेश बिग बॉस ओटीटीमध्येही झळकला आहे. यात त्याचं शमिता शेट्टीसोबतचं अफेअर सर्वात जास्त चर्चिलं गेलं.

राकेश अलिकडेच खुर्ची या सिनेमात झळकला. परंतु, त्यापूर्वी तो वृंदावन या सिनेमात झळकला होता. मात्र, हा सिनेमा यशस्वी झाला नाही.

मराठी सिनेमात झळकल्यानंतर आता राकेशने मराठीतील एका मालिकेत पदार्पण केलं आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

राकेश लवकरच झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत झळकणार आहे.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.