बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:32 IST2025-08-22T13:19:54+5:302025-08-22T13:32:20+5:30

अभिनेत्रीने या फोटोंमधून तिच्या नवऱ्याचा चेहरा गायब केला आहे. त्यामुळे फक्त त्याचं धडच दिसत आहे.

सेलिब्रिटी कधी काय करतील याचा नेम नाही. सध्या एका अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मराठी अभिनेत्रीने नवऱ्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, या फोटोंमध्ये तिच्या नवऱ्याचा चेहराच दिसत नाहीये.

अभिनेत्रीने या फोटोंमधून तिच्या नवऱ्याचा चेहरा गायब केला आहे. त्यामुळे फक्त त्याचं धडच दिसत आहे.

"तू कधीच नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत नाहीस. आता म्हणा- वाह तुझा नवरा हँडसम आहे", असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.

ही अभिनेत्री म्हणजे पुढचं पाऊल फेम माधुरी देसाई आहे. माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नवऱ्यासोबतचे हे फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

माधुरीने मीटर डाऊन, येक नंबर मालिकांमध्ये काम केलं आहे. पण आता ती कलाविश्वापासून दूर आहे.

माधुरी सध्या कॅलिफोर्नियामध्ये असते. तिथे ती तिच्या नवऱ्यासोबत स्थायिक झाली आहे.