सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी-मुक्ताची दुबई ट्रीप; फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:31 IST2024-08-19T17:24:56+5:302024-08-19T17:31:21+5:30

स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर तसेच राज हंचनाळे यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळते आहे.

सुंदर आणि प्रेमळ नात्याची गुंफन या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सावनी नावाचं पात्र साकारलं आहे. तर तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका निभावते आहे.

मालिकेत सवतींच्या भूमिकेत दिसणाऱ्या मुक्ता आणि सावनी सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

अपूर्वा नेमळेकरने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे आणि तेजश्री प्रधानचे दुबई ट्रीपचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

दुबईतील बुर्ज खलिफा तसेच एअरपोर्टवरील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"Making memories, living to the fulles" असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.