बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:52 IST2025-08-08T16:28:47+5:302025-08-08T16:52:10+5:30
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ताने उच्चशिक्षण घेतलं आहे. ती एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला आहे आणि ती लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रीचं अभिनंदन करत तिच्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज खुटवड असं आहे. उद्योजक आणि पैलवान असलेल्या शंभूराज यांच्यासोबत प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ताने उच्चशिक्षण घेतलं आहे. ती एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे.
प्राजक्ताचा जन्म ६ ऑक्टोबर १९९९ साली झाला. आता २५ व्या वर्षी ती बोहल्यावर चढणार आहे.
प्राजक्ताने 'आई माझी काळुबाई', 'राजमाता जिजाऊ' या मालिकांमध्ये काम केलं आहे.