कपाळी चंद्रकोर अन् नाकात मोत्याची नथ; 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील 'इमली'चा पारंपरिक लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:13 IST2024-08-26T17:08:12+5:302024-08-26T17:13:57+5:30
अभिनेत्री मधुरा जोशीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत तिने साकारलेलं 'इमली' नावाचं पात्र चाहत्यांना प्रचंड आवडलं.
अभिनयाव्यतिरिक्त मधुराचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
नुकतंच अभिनेत्रीने स्वत: च्या कपड्यांच्या ब्रॅंडसाडी नऊवारी साडी नेसून हे फोटोशूट केलं आहे.
मधुरासह पती गुरु दिवेकरनेही तिला साथ देत फोटो क्लिक केले आहेत.
फोटोंमध्ये फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे मोत्यांचे दागिने असा पेहराव तिने केला आहे. तर गुरु दिवेकरने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलाय.
अभिनेत्रीचे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. फोटोमधील पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलं आहे.