PHOTOS : 'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई उर्फ प्राजक्ता गायकवाडचा पहा ऑफस्क्रीन लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:46 IST2020-02-27T19:42:35+5:302020-02-28T12:46:00+5:30

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय असून वेळोवेळी या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले.
या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे.
येसुबाई ही भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत असून तिला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मालिकेसाठी प्राजक्ताने बरीच मेहनत घेतली तसेच तिने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं.
येसुबाई या भूमिकेसाठी प्राजक्ता नेहमीच नऊवारी साडी नेसते. तसेच भरगच्च दागिने घालते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात तिला ओळखणे देखील तिच्या चाहत्यांना कठीण जाते.
प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात पाश्चिमात्य कपडे देखील घालायला आवडतात.
प्राजक्ता शालेय, आंतरशालेय एकांकिका, नाटकांमध्ये भाग घ्यायची.
प्राजक्ताला बॉलिवूड, हिप-हॉप आणि कथ्थक हे सर्व डान्सचे प्रकार येतात.
या मालिकेमुळे प्राजक्ताला आता प्रेक्षक महाराणी येसुबाई म्हणूनच ओळखू लागले आहेत.
लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे