लोकप्रिय ठरलेली बालकलाकार 'वीरा' आठवते का? आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:20 IST2022-03-11T17:15:26+5:302022-03-11T17:20:25+5:30

Child artist: वयाच्या ५ व्या वर्षापासून हर्षिता कलाविश्वात सक्रीय आहे. मात्र, तिला अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात करिअर करायचं नाही असंही तिने सांगितलं आहे.

२०१२ ते २०१५ या कालावधीत लोकप्रिय झालेली एक वीर की अरदास-वीरा ही मालिका साऱ्यांच्याच लक्षात असेल.

ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली होती.

या मालिकेत मराठीमोळी अभिनेत्री स्नेहा वाघ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.

विशेष म्हणजे या मालिकेतील बालकलाकार हर्षिता ओझाने अनेकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. त्यामुळे लोकप्रिय बालकलाकार म्हणून ती विशेष ओळखली जात होती.

हर्षिताने या मालिकेत मस्तीखोर वीराची भूमिका साकारली होती.

मालिका संपल्यानंतर छोटी वीरा काय करते?कशी दिसते? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. परंतु, ही लहानशी वीरा आता चांगलीच मोठी झाली आहे.

हर्षिता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

हर्षिताला अभिनयासोबतच गायनाचीही विशेष आवड आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं.

वयाच्या ५ व्या वर्षापासून हर्षिता कलाविश्वात सक्रीय आहे. मात्र, तिला अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात करिअर करायचं नाही असंही तिने सांगितलं आहे.