PHOTOS : ‘Ratris Khel Chale 3 ’ची नवी शेवंता...! तिचे फोटो पाहाल तर फिदा व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:00 AM2021-11-25T08:00:00+5:302021-11-25T08:00:02+5:30

Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व सध्या सुरू आहे. पण मालिकेत शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं अचानक एक्झिट घेतली आणि चाहत्यांची काहीशी निराशा झाली. पण मालिकेला नवी शेवंता मिळालीये.

‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व सध्या सुरू आहे. पण मालिकेत शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं अचानक एक्झिट घेतली आणि चाहत्यांची काहीशी निराशा झाली. पण आता मालिकेला नवी शेवंता मिळालीये.

होय, ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिन्ही पर्वात आत्तापर्यंत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं शेवंताची भूमिका साकारली होती. पण आता तिनं ही मालिका सोडली आहे आणि तिच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर ही नवी शेवंता साकारणार आहे.

सोशल मीडियावर या नवीन शेवंताचा फोटो व्हायरल झालाय आणि ही नवी शेवंताही झक्कास आहे. होय, तिचेच फोटो पाहाल तर तुम्ही फिदा व्हाल.

‘बबन’ या सिनेमात कृतिकाने हौसा नावाच्या बाईची व्यक्तिरेखा साकारली होती. यासाठी तिने चक्क 12 किलो वजन वाढवलं होतं.

कृतिका एक गुणी अभिनेत्री आहे. वयाच्या 11 वर्षांपासूनच ती रंगभूमीवर काम करतेय.

हिंदी, गुजराती, इंग्रजी, हिंदी अशा शेकडो नाटकांमधून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

प्रीती संगम, लग्नबंबाळ, आई तुला कुठे ठेऊ अशा नाटकांत ती झळकली. मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचं तिचं ‘उलट सुलट’ नावाचं नाटक चांगलंच गाजलं होतं.

तुम्हाला माहित नसेल पण कृतिका कथ्थक विशारद आहे. ती मूळची सायकॉलॉजिस्ट असून करिअर म्हणून तिनं अभिनय क्षेत्राची निवड केली आहे.

खरं तर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली .

अपूर्वानं मालिका का सोडली , हे अद्यापही समजू शकलं नाहीए. पण हो, नव्या शेवंताची चर्चाही जोरात आहे.