‘सा रे ग म प’च्या सेटवर नेहा कक्करने पूर्ण केली संजनाची ‘ड्रीम वेडिंग’ची इच्छा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 13:28 IST2021-12-24T13:15:18+5:302021-12-24T13:28:42+5:30
रिएलिटी शो ‘सा रे ग म प’ शो सध्या चांगलाच गाजत आहे.आगामी भाग रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. कारण या भागात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.

येत्या भागात या कार्यक्रमातील अंतिम 12 स्पर्धक एकमेकांविरुध्द स्पर्धा करणार असून त्यांच्या अप्रतिम गायनकलेमुळे देशभरातील प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील. यावेळी एक स्पर्धक संजना भटने गायलेल्या काला चष्मा आणि बद्रिनाथ की दुल्हनिया या गाण्यांनी प्रेक्षक थक्क झाले.
संजनाच्या आवाजावर नेहा इतकी खुश झाली की तिने तिला आपली धाकटी बहीणच मानले आणि तिला संजना कक्कर अशी हाक मारण्यास सुरुवात केली. पण यानंतर पुढे काय घडले, ते पाहून सर्वजण अवाक् झाले.
नेहाने नंतर संजनाला एक खास व्हिडिओ दाखविला. नेहा म्हणाली की पूर्वी काही कारणास्तव संजनाला आपल्या लग्नाची व्हिडिओ सीडी बनविता आली नव्हती, असे माझ्या कानावर आले होते आणि तिला आता संजनासाठी काहीतरी खास करायचे आहे.
कार्यक्रमाच्या टीमने एक खास ‘एव्ही’ सुरू केला, तेव्हा संजना भावविवश झाली. इतकेच नव्हे, तर नेहा कक्कर म्हणाली, “आम्ही तेव्हा तुझ्या लग्नात उपस्थित राहू शकलो नव्हतो. पण तू आता आमच्या कुटुंबाचा भाग बनली आहेस तेव्हा इथे सा रे ग म पच्या सेटवर आम्ही तुझं लग्न लावून त्यात सहभागी होणार आहोत.”
यानंतर ‘सा रे ग म प’च्या टीमने आणि नेहा व रोहनप्रीतने सेटवर आवश्यक ते बदल केले आणि त्यानंतर संजना पुन्हा एकदा तिच्या पतीबरोबर विवाहबंधनात अडकली. किंबहुना नेहा आणि रोहनप्रीत यांनी संजनाचे तिच्या पतीबरोबर पुन्हा एकदा थाटात लग्न लावून दिले.
या सुंदर समारंभात या दाम्पत्याने पुन्हा एकदा लग्नाची शपथ आणि सात फेरे घेतले आणि संजनाचे आपले ड्रीम वेडिंगचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी संजनाच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
घर बसल्या रसिकांना हा आगळा वेगळा सोहळा पाहता येणार आहे. हा विवाहसोहळा रिएलिटी शोमध्ये पाहणे रसिकांसाठी एक आगळी- वेगळी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.