अंडरवर्ल्डच्या तावडीतून २० वर्षानंतर सुटका; ४८ वर्षीय अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन बघून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:47 PM2023-01-18T15:47:52+5:302023-01-18T15:58:09+5:30

वयाच्या ४८ व्या वर्षीही ती खूपच तरुण आणि सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही.

Monica Bedi Birthday: 'सरस्वतीचंद्र' फेम अभिनेत्री मोनिका बेदी आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी तरुण अभिनेत्रींना लाजवेल असा फिटनेस तिचा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मोनिका बेदी 90च्या दशकातील अनेक सिनेमात दिसली होती. अनेक गाजलेल्या सिनेमात तिने काम केलं. पण अभिनेत्री म्हणून तिला फार काही यश मिळू शकलं नाही. पण डॉनसोबत रिलेशनशिपमुळे ती जगभरात फेमस झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

मोनिका बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होती तेव्हा डॉन अबू सालेमची नजर पडली होती. सालेमने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना धमक्या देऊन तिला कामं मिळवून दिली. याचा खुलासा हुसैन जैदी यांनी त्यांच्या 'माय नेम इज अबू सालेम' पुस्तकात केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

मोनिका बेदी आणि अबू सालेम यांची 90च्या दशकात चांगलीच चर्चा झाली. मोनिकाही अबू सालेमच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत पोर्तुगालमध्ये राहत होती. (फोटो इन्स्टाग्राम)

अबू सालेममुळे मोनिका बेदीला तुरुंगात जावे लागले होते. 2002 मध्ये तिला अटक करण्यात आली होती. दोन वर्षे ती पोर्तुगालच्या तुरुंगात कैद होती आणि नंतर तिला काही काळ भारताच्या तुरुंगात राहावे लागले. 2006 मध्ये त्याची सुटका झाली. (फोटो इन्स्टाग्राम)

तुरूंगातून बाहेर आल्यावर तिने अबू सालेमसोबतचं नातं तोडलं आणि हा केवळ एक अपघात होता असं एका मुलाखतीत सांगितलं. (फोटो इन्स्टाग्राम)

मोनिका बेदीने पुन्हा तिच्या करिअरला सुरुवात केली आणि 'बिग बॉस 2' या वादग्रस्त शोमध्ये दिसली. (फोटो इन्स्टाग्राम)

मोनिका बेदी सध्या सिनेमात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी मोनिका बेदी खूपच तरुण आणि सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्सही आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील चब्बवाल गावात जन्माला आलेला मोनिकाचे आई-वडील नॉर्वेमध्ये गेले. आणि मोनिकाचं शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालं. (फोटो इन्स्टाग्राम)