Romantic PICS ! जस्सीची लव्हस्टोरी...; अशी सुरु झाली होती मोना सिंगची प्रेमकहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:20 IST2021-10-08T16:46:01+5:302021-10-08T18:20:36+5:30
Mona Singh Birthday : पाहा, मोना व श्यामचे रोमॅन्टिक फोटो...

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग हिचा आज वाढदिवस.
आज तिच्या वाढदिवसानिमित्त मोनाची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वांची लाडकी जस्सी प्रेमात कशी पडली, यामागची कथा चांगलीच इंटरेस्टिंग आहे.
27 डिसेंबर 2019 रोजी मोनाने श्याम राजगोपालनसोबत लग्नगाठ बांधली होती. त्याआधी 5 वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते.
एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत मोना व श्याम पहिल्यांदा भेटले होते. पहिल्याच भेटीस मोना श्यामवर भाळली होती.
श्याम स्वभावाने अतिशय खोडकर. त्याचा हाच स्वभाव मोनाला आवडला. पुढे दोघांची मैत्री झाली.
यानंतर आॅक्टोबर महिन्यात अशाच एका वाढदिवसाला श्यामने मोनाला लग्नासाठी प्रपोज केले. खरं तर मोनासाठी हा सुखद धक्का होता.
काहीही ध्यानीमनी नसताना श्यामने अंगठी काढली आणि माझ्याशी लग्न करणार का? असं विचारलं आणि मी हो किंवा नाही म्हणण्याआधीच अंगठी तिच्या बोटात घातली सुद्धा...
अरे मला हो किंवा नाही तर म्हणू दे, असं मोना यावर म्हणाली पण तोपर्यंत बोटात अंगठी गेली होती. एकंदरच हे सगळं फिल्मी होतं.
मोनाचा नवरा साऊथ इंडियन बँकर आहे. मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत ती दिसली होती. लवकरच मोना ‘लाल सिंग चड्ढा’ या आमिर खानच्या सिनेमात दिसणार आहे. यात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.