छोटी परी लवकरच होणार मोठी ताई! मायराच्या आईचं मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:57 IST2024-09-04T14:45:49+5:302024-09-04T14:57:22+5:30
मायराचे आई-बाबा श्वेता व गौरव वायकुळ हे आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते.
लहान वयातच तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
मायराच्या घरी पाळणा हलणार आहे आणि मायरा मोठी ताई होणार आहे.
नुकतंच मायराच्या आईचे खास मॅटर्निटी फोटोशूट करण्यात आलं आहे.
मायरा आईने मॅटर्निटी फोटोशूटसाठी अगदी सुंदर असा लूक केला.
मायरा ही पांढरा टॉप व जीन्समध्ये अगदी गोड दिसत आहे. आजूबाजूला सुंदर डेकोरेशन दिसत आहे.
तिच्या आईने केशरी रंगाचा वेस्टर्न ड्रेस तर वडिलांनी पांढऱ्या रंगाचा सूट व जीन्स परिधान केली.
गुढीपाडव्याच्या दिवशी मायराने आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.
यामध्ये मायरा स्वतः कॅमेरा हातात घेऊन फोटो काढताना पाहायला मिळतेय.
मायराच्या आईचा हा नववा महिना आहे. लवकरच मायराच्या घरात गोंडस बाळाचं आगमन होईल.