तुझ्या रुपाचं चांदणं: नक्षीची भूमिका साकारणारी कोण आहे 'ही' अभिनेत्री? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 16:00 IST2021-12-24T16:00:00+5:302021-12-24T16:00:00+5:30
Tuzya rupach chandan: तुझ्या रुपाचं चांदणं या मालिकेची कथा नक्षत्रा अर्थात नक्षी हिच्या भोवती फिरतांना दिसते.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच 'तुझ्या रुपाचं चांदणं' ही नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहे.
'गरीबाघरी सौंदर्य हा शाप आहे', अशी टॅग लाईन असलेली ही मालिका येत्या २७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तुझ्या रुपाचं चांदणं या मालिकेची कथा नक्षत्रा अर्थात नक्षी हिच्या भोवती फिरतांना दिसते.
या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री नेमकी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
या मालिकेत नक्षीची भूमिका अभिनेत्री तन्वी शेवाळे साकारत आहे. विशेष म्हणजे पडद्यावर सावळ्या वर्णात झळकलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
तन्वीने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने काही सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन लोकप्रियता मिळवली आहे.
छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या तन्वीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे.
तन्वीला फोटोशूटची विशेष आवड असून तिने तिच्या सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.