'आनंदी आनंदी असतांना…' राजाध्यक्षांच्या सुनेचा पारंपरिक साज; मनमोहक फोटो Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:02 IST2024-05-11T15:56:53+5:302024-05-11T16:02:15+5:30

अभिनेत्री दिव्या पुगावकर हे नाव मराठी मालिका विश्वात चांगलच प्रचलित आहे.

'मुलगी झाली हो' या मालिकेत तिने साकारलेल्या माऊ नावाच्या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतलं होत.

साधी,सालस असणारी माऊ अल्पवधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली.

दरम्यान, सध्या दिव्या स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

तिने या आधी 'मुलगी झाली हो', 'प्रेमा तुझा रंग कसा' आणि 'विठुमाऊली' या मालिकांमध्ये काम केले आहे.

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

पिवळ्या रंगाची साडी, गळ्यात मंगळसुत्र तसेच हातात हिरव्या बांगड्या असा पेहराव तिने केला आहे.

त्याचबरोबर या फोटोंवर तिने 'आनंदी आनंदी असताना...' असं कॅप्शन देत नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.