'म्हारी छोरिया छोरोसे कम हैं के...' शिवाली-बिवालीची अतरंगी स्टाईल, कॉटन साड्यांनी वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:51 IST2024-03-29T16:41:07+5:302024-03-29T16:51:02+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतेय.

कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांनी एकत्र केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून या दोघी घराघरात पोहचल्या. अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर आपलं नाव कोरलंय.
या फोटोंमध्ये शिवाली परब निळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत तर प्रियदर्शनीने हिरव्या रंगाची कॉटनची साडी नेसली आहे.
या फोटोशूटसाठी दोघींनीही सिंपल लूकला पसंती दिली आहे.
डोळ्यांना चष्मा तसेच हटके पोज देत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या या फुलराण्यांनी हे फोटोशूट केलंय.
शिवाली आणि प्रियदर्शनीच्या या फोटोंवर अभिनेता समीर चौघुले यांनी ''Ohh You Beauties'' अशी कमेंट केली आहे.
एका साड्यांच्या ब्रॅंडसाठी या दोघींनी हे फोटोशूट केलं आहे.