कपाळावर मळवट अन् ठसठशीत कुंकू; जोगतीणीच्या लूकमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? लोकप्रिय मालिकेत करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:34 IST2025-05-28T18:24:14+5:302025-05-28T18:34:14+5:30
जोगतीणीच्या लूकमधील या अभिनेत्रीला ओळखलं का? लोकप्रिय मालिकेत करतेय काम

झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.
या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साकारली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.
सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये प्राप्ती जोगतिणीच्या लूकमध्ये पाहायला मिळते आहे.
कपाळावर मळवट अन् ठसठशीत कुंकू तसेच नऊवारी साडी नेसून तिने लूक पूर्ण केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. मालिकेतील एका सीनसाठी तिने हा लूक केला आहे, असं म्हटलं जात आहे.
"सावलीने घेतला जोगतिणीचा अवतार...", असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
दरम्यान, प्राप्ती रेडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने, ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.