हिरवी नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा ब्रायडल लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:42 IST2024-11-26T13:35:18+5:302024-11-26T13:42:13+5:30
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

या मालिकेतील स्टारकास्ट तसेच त्यांचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे.
दरम्यान मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अक्षय आणि रेवाचं लग्न होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
परंतु, अक्षयला मिळवण्यासाठी रेवाने रचलेला कट रमाक्षय सगळ्यांसमोर उधळून लावतात.
निशाणीने सध्या सोशल मीडियावर तिचे ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चा रंगली आहे.
अभिनेत्रीला नवरीच्या रुपात पाहून चाहते संभ्रमात आहेत. पण, निशाणीने 'मुरांबा' मालिकेसाठी हा खास लूक केला होता.
फोटोंमध्ये हिरवी नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज अशा परफेक्ट ब्रायडल लूकमध्ये ती पाहायला मिळते आहे.
निशाणी बोरुले या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.