'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेची परदेशवारी; 'पोलंड' सफर करण्यात रमली अभिनेत्री, पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 14:20 IST2024-09-13T14:09:15+5:302024-09-13T14:20:26+5:30
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पोलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.

हृता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
अलिकडेच ती "कमांडो करण सक्सेना" या वेबसिरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
सध्या अभिनेत्री तिच्या बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसते आहे.
पोलंडमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत हृताने फोटो क्लिक केले आहेत. त्यासोबतच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ते फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अभिनेत्री हृता दुर्गुळेने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
मालिका विश्वातून कलाविश्वात तिने पदार्पण केले. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
वेगवेगळ्या मालिका, नाटक आणि त्यानंतर सिनेमा अशा माध्यमात तिने आपला ठसा उमटवला आहे.