"तेरे नैना बडे कातिल…"; 'मन धागा धागा जोडते नवा' फेम दिव्या पुगावकरचं ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:12 IST2024-11-22T15:05:09+5:302024-11-22T15:12:22+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रसिद्धीझोतात आली.

निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
सध्या मराठी मालिकाविश्वात दिव्याच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते.
झी मराठीवरील आगामी 'लक्ष्मी निवास' मालिकेत अभिनेत्री आता पाहायला मिळणार आहे.
'मुलगी झाली हो' मधील 'माऊ' तसेच 'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये आनंदी साकारून दिव्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
आता ती नव्या भूमिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
अशातच सोशल मीडियावर दिव्याने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.
"You Are Enough…"असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.